होर्मुझ सामुद्रधुनीजवळ चार तेलवाहू जहाजांना आग; इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डकडून दोन जहाजे जप्त
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ चार तेलवाहू जहाजांना आग लागली. या आगीत ही जहाजे उद्धवस्त झाली. दक्षिणेकडील प्रतिबंधित मार्गावरून जात असताना सागरी खाणींवर जहाजे आदळल्याने ही घटना घडली. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) ही माहिती दिली.
चारही जहाजे अजूनही जळत आहेत. याव्यतिरिक्त, इराणच्या लष्कराने इतर दोन जहाजे जप्त केली आहेत, असे विशेष दलाने एका निवेदनात म्हटले आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर इराणने आपले कडक नियंत्रण असल्याचे स्पष्ट केले आहे.
Comments are closed.