अमेरिकेतील गोळीबारात गुजराती महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथे चेहऱ्यावर मास्क घालून आलेल्या हल्लेखोराने एका सुपरमार्केटमध्ये शिरून गोळीबार केला. त्याने केलेल्या गोळीबारात 45 वर्षीय मेघना पटेल या महिलेचा मृत्यू झाला. मेघना या गुजरातमधील मेहसाणातील विसापूरमध्ये असलेल्या जंत्राल गावाच्या रहिवासी होत्या. गेली दहा वर्षे व्हर्जिनियात सुपरमार्केटमध्ये काम करायच्या. या घटनेमुळे व्हर्जिनियातील हिंदुस्थानी आणि गुजरातमध्ये शोककळा पसरली आहे.

सुपरमार्केटमधील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यात असे दिसून येते की, एका मास्क घातलेल्या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. त्यावेळी सुपरमार्केट रिकामे होते. हल्लेखोर येतो, महिलेशी काहीतरी बोलतो आणि काही सेकंदांमध्ये बंदूक काढून गोळीबार सुरू करतो. गोळी लागताच मेघना खाली कोसळली. त्यानंतर काऊंटरवरून उडी मारून हल्लेखोराने खाली कोसळलेल्या मेघनावर लागोपाठ गोळ्या चालवल्या.

Comments are closed.