रशियाच्या हल्ल्यात हिंदुस्थानी नागरिक ठार, मोदी पुतीन यांची गळाभेट घेत असताना हवाई हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची गळाभेट घेत असताना रशियाने युक्रेनच्या कीव आणि जवळपासच्या परिसरात केलेल्या हवाई हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून यात एका हिंदुस्थानी नागरिकाचाही समावेश आहे, असा दावा युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली असून यात त्यांनी हा दावा केला आहे. मोदी आणि पुतीन यांची भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झेलेन्स्की यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

मागील चार वर्षांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांनाही बसत आहे. किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांची सोमवारी भेट झाली होती. रशियन सैन्याने कीव आणि आसपासच्या परिसरात रात्रभर क्षेपणास्त्र व ड्रोनच्या माध्यमातून हवाई हल्ले केले. यामुळे राजधानीत सलग सहाव्या दिवशी ठिकठिकाणी स्फोटाचे आवाज येत होते.

Comments are closed.