हिंदुस्थानला येणारे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ने पुन्हा इराणला नेले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने होर्मुझमध्ये बुधवारी दोन जहाजांवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोन्ही जहाजे जप्त करून इराणमध्ये नेण्यात आली. हल्ला केलेल्या जहाजांपैकी एक जहाज हिंदुस्थानात येत होते. इराणच्या सरकारी मीडियानुसार, एमएससी फ्रान्सिस्का आणि एपामिनोड्स अशी जहाजांची ओळख पटली आहे. एमएससी फ्रान्सिस्कावर पनामाचा ध्वज आहे, तर एपामिनोड्सवर लायबेरियाचा ध्वज आहे.

जहाज ट्रॅकिंग डेटानुसार, एपामिनोड्स हे जहाज दुबईहून गुजरातमधील मुंद्रा बंदराकडे जात होते. या जहाजावर आयआरजीसीने हल्ला करून ते ताब्यात घेतले, असे वृत्त आज तकने दिले आहे. जहाजाच्या जप्तीमुळे सागरी सुरक्षा आणि पुरवठा साखळीबाबत देशाची चिंता वाढली आहे.

कारवाईबाबत इराणच्या IRGC ने एक निवेदन जारी केले आहे. एमएससी-फ्रान्सिस्का (MSC-FRANCESCA) आणि एपामिनोड्स (EPAMINODES) ही दोन जहाजे आवश्यक परवानगीशिवाय कार्यरत होती आणि त्यांनी नेव्हिगेशन प्रणालीमध्ये फेरफार करून सागरी सुरक्षेला धोका निर्माण केला होता, असे इराणच्या IRGC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आयआरजीसी नौदलाने ती जहाजे ताब्यात घेतली आणि इराणच्या किनाऱ्यावर आणली. दोन्ही जहाजे सध्या इराणच्या सागरी हद्दीत असून जहाजातील माल, कागदपत्रे आणि संबंधित नोंदींची तपासणी केली जात आहे.

Comments are closed.