धक्कादायक! नागपुरात बेपत्ता तरुणाचा मृतदेह नाल्यात आढळला, घातपात झाल्याची माहिती

नागपूर क्राईम न्यूज : नागपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाल्यामध्ये एका बोरीत एक मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता सदर मृतदेह हा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल असलेल्या राहुल शाहू या व्यक्तीचा असल्याचे स्पस्ट झाले आहे. आरोपींनी राहुलची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राहुलची हत्या कोणी केली व कशासाठी केली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

परिसरात खळबळ

नागपूर जिल्ह्यातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाल्यामध्ये एका बोरीत एक मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल शाहू असं या व्यक्तीचं नाव असून, या व्यक्तीची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हत्या झालेला तरुण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर या तरुणाचा नाल्यात मृतदेह आढळला आहे. हा घातपात असल्याची माहिती देण्यात आली आहे. नेमका हा घात कोणी केला? यामध्ये कोण कोण सामील आहे? याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.