होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ स्फोटाचे अवशेष जहाजावर पडले, दोन हिंदुस्थानी खलाशी जखमी
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना एका स्फोटाचे अवशेष जहाजावर पडल्याने दोन हिंदुस्थानी खलाशी जखमी झाले आहेत. टोगो देशाचा ध्वज असलेल्या ‘एमटी चिरॉन 7’ या जहाजावर ही घटना घडली. अंकित कुमार आणि सागर चंद अशी जखमी हिंदुस्थानी खलाशांची नावे आहेत.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना एका स्फोटाचे अवशेष जहाजावर पडले. यात दोन हिंदुस्थानी खलाशांसह एक इजिप्शियन खलाशी जखमी झाला, असे असे नौवहन महासंचालनालयाने सांगितले. या जहाजावर 17 हिंदुस्थानींसह एकूण 24 खलाशी होते. सध्या हे जहाज सुरक्षित असून शारजाहच्या दिशेने रवाना झाले आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जहाजावरील सर्व खलाशी सुखरुप आहेत. होर्मुझच्या सामुद्रधनुष्यात जहाजावर हल्ला; दोन भारतीय खलाशी जखमी
Comments are closed.