गुड न्यूज नंतर ‘दीपवीर’ची पहिली झलक! मुंबई विमानतळावर दीपिकानं फ्लॉन्ट केला बेबी बंप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूडमधील ‘पॉवर कपल’ दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. ही बातमी समोर आल्यापासून चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ही घोषणा केल्यानंतर मंगळवारी दीपिका पहिल्यांदाच पती रणवीरसोबत मुंबई विमानतळावर दिसली. मात्र, यावेळी दोघांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे टाळले आणि ते थेट विमानतळाच्या दिशेने निघून गेले.

रणवीर आणि दीपिका यांचा विमानतळावरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्या ‘एअरपोर्ट लूक’ची चर्चा रंगली आहे. दीपिकाने यावेळी निळ्या रंगाचा ओव्हरसाईज शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती, तर रणवीर पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि कार्गो जीन्समध्ये दिसला. या व्हिडीओमध्ये रणवीर संपूर्ण वेळ दीपिकाची काळजी घेताना आणि तिला सावरताना दिसला.

रणवीर आणि दीपिकाने 19 एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली होती. या पोस्टमध्ये त्यांची मुलगी ‘दुआ’ हिच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट असलेला फोटो शेअर करण्यात आला होता. दीपिका आणि रणवीरची पहिली भेट 2013 मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे त्यांनी शाही थाटात लग्न केले.

या जोडप्याला 8 सप्टेंबर 2024 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले, जिचे नाव त्यांनी ‘दुआ’ ठेवले आहे. त्यानंतर आता 2026 मध्ये दीपिकाने पुन्हा एकदा ही गोड बातमी दिल्याने सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या लाडक्या जोडीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.