नेपाळमधील फेवा सरोवरात कार कोसळली; दोन हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू, दोन जखमी
नेपाळमधील पोखरा येथे फेवा सरोवरात कार कोसळून दोन हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे 4.50 च्या सुमारास ही घटना घडली. नवदीप कुमार यादव (27) असे एका मृताचे नाव असून दुसऱ्याची ओळख पटवण्यात येत आहे. तर अनमोल कुमार यादव (27) आणि सूरज यादव (33) अशी जखमींची नावे आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व तरूण बिहारमधील रहिवासी आहेत. सेडीकडून लेकसाइडकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पोखरा-18 मधील गौरीचौतरा वळणाजवळ पहाटे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या साहाय्याने कार सरोवरातून बाहेर काढण्यात आली आणि ती बैदाम वॉर्ड पोलीस कार्यालयात नेण्यात आली.
बेशुद्धावस्थेतील दोघांना पोखरा अकॅडमी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन जखमींना उपचारासाठी गंडकी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.
Comments are closed.