… त्यावेळी खूप घाबरले होते मात्र वडिलांनी धीर दिला; गायिका श्रेया घोषालने सांगितला ट्रेनमध्ये घडलेला प्रसंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या आयुष्यातील एक वैयक्तिक आणि भावनिक प्रसंग नुकताच सांगितला. ‘सारेगामापा’च्या शूटिंगवरून घरी परतत असताना ट्रेनमध्येच तिला पहिली पाळी आली होती. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे ती घाबरली होती. मात्र, तिच्या वडिलांनी तिला धीर देत परिस्थिती सांभाळली. श्रेया घोषालने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पहिल्या पाळीचा अनुभव सांगितला. ती म्हणाली की, ट्रेनमध्ये असताना अचानक तिला काहीतरी गडबड झाल्यासारखे वाटले. त्यानंतर तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली.

पहिली पाळी आल्याने घाबरलेल्या श्रेयाला तिच्या वडिलांनी शांत केले. ट्रेनमध्ये असल्याने त्यावेळी लगेच सॅनिटरी पॅड्स मिळवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी परिस्थिती समजून घेत मुलीला धीर दिला आणि काहीतरी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. घरी पोहोचल्यानंतर श्रेयाच्या वडिलांनी सर्वप्रथम तिच्यासाठी सॅनिटरी पॅड्स आणले. मुलीच्या अशा संवेदनशील प्रसंगी त्यांनी कोणताही संकोच न करता तिची काळजी घेतली.

श्रेया आपल्या वडिलांच्या खूप जवळ आहे. तिच्या संगीताच्या कारकिर्दीतही त्यांनी तिची खंबीर साथ दिली. समाजातील लोकांच्या संकुचित विचारांकडे दुर्लक्ष करून त्यांनी मुलीच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिल्याचे श्रेया सांगते. श्रेया लहान असताना काही लोक तिच्या वडिलांना, ‘अभ्यासाऐवजी मुलीला गाणे शिकवून तुम्ही एवढी ऊर्जा का वाया घालवत आहात?’असा सवाल करायचे. मात्र, तिच्या वडिलांनी अशा बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

Comments are closed.