गेटवे ऑफ इंडियाजवळ थरारक घटना; समुद्रात बोटीचे इंजिन बंद पडले, 38 पर्यटकांचे प्राण कंठाशी
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रात गुरुवारी थरारक घटना घडली. एक फेरी बोटीचे इंजिन समुद्रात बंद पडले आणि 38 प्रवाशांचा श्वासच जणू अडकला. स्थानिक पोलीस आणि स्थानिक बोट चालकाने प्रसंगावधान राखत 34 प्रवाशांसह 38 जणांची सुखरुप सुटका केली.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अनवारी या फेरीचे गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास किनाऱ्यापासून सुमारे 1.5 सागरी मैल अंतरावर तिचे इंजिन बंद पडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथेच असलेल्या आझाद हिंद जहाजाच्या मालकाशी संपर्क साधत मदतीची विनंती केली.
आझाद हिंद जहाज घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री सुमारे साडेनऊ वाजता अनवारीला गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक 2 वर सुरक्षितपणे ओढून आणले. जहाजावरील सर्व 38 जणांना सुखरूप किनाऱ्यावर उतरण्यात आले आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
Comments are closed.