समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलचं मालक कोण असतं? जाणून घ्या

नवी दिल्ली : सध्या इंटरनेट सुरु असणं ही प्रत्येकाची गज बनली आहे. सोशल मिडिया, व्हिडिओ कॉल, ऑनलाईन शॉपिंग, यूट्यूब, ऑफिसचं काम इंटरनेटवर अवलंबून असते. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का इंटरनेट कुठून येतं. अनेक लोकांना इंटरनेट आकाशातून म्हणजेच सॅटेलाईट किंवा मोबाईल टॉवर द्वारे येतं असं वाटतं. मात्र, जगातील 99 टक्के इंटरनेट समुद्राच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून येतं. म्हणजेच इंटरनेट आकाशातून नव्हे तर समुद्राच्या तळाशी असलेल्या केबलमधून येतं.

जगातील विविध देशांना इंटरनेटद्वारे जोडण्याचा मजतूब आणि विश्वासार्ह मार्ग म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल हा आहे. या केबल हजारो किलोमीटर लांबीच्या असतात. ज्या समुद्राच्या तळाशी टाकलेल्या असतात. यापद्धतीनं जगातील एका भागातून दुसऱ्या भागात इंटरनेटद्वारे डेटा पाठवला जातो आणि स्वीकारला जातो. इंटरनेटच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या केबलचं मालक कोण असतं जाणून घेऊयात

इंटरनेट केबल्स इतिहास

इंटरनेट केबल्सची सुरुवात 1830 च्या दशकात झाली होती. जेव्हा टेलिग्राफची सुरुवात झाली होती. त्यावेळी संदेशवहनासाठी तारसेवा वापरली जायची.  त्यानंतर 1858 मध्ये अमेरिकेचे उद्योजक सॉयरस वेस्टफील्ड यांनी अटलांटिक महासागराच्या तळाशी पहिली टेलिग्राफ केबल टाकली.ज्याद्वारे अमेरिका आणि ब्रिटन जोडले गेले. ही केबल फार दिवस चालली नाही, मात्र ती सुरुवात होती. 1866 मध्ये पहिली स्थायी अंडर सी केबल यशस्वीपणे टाकण्यात आली. ज्यानंतर समुद्राच्या तळाशी टेलिग्राफ आणि इंटरनेट केबल्स टाकण्यात आल्या.

सध्या जगाला जोडणाऱ्या 14 लाख किलोमीटर लांबीच्या अंडर सी केबल्स आहेत. जगातील 99 टक्के इंटरनेट त्या केबल्समधून येतं. भारतात बहुतांश इंटरनेट सागरी केबल्स मधून येतं. जवळपास 95 टक्के  इंटरनॅनशल डेटा ऑप्टिक फायबर केबल्स द्वारे देशात येतो. भारतात एकूण 17 इंटरनेट केबल्स येतात ज्या 14 सागरी स्टेशन्स सोबत जोडलेल्या आहेत. ही स्टेशन प्रामुख्यानं मुंबईचेन्नई , कोचीन, तूतीकोरिन, त्रिवेंद्रम मध्ये आहेत. या ठिकाणी समुद्राच्या तळातून केबल्स येतात. तिथून देशाच्या विविध भागात इंटरनेट पोहोचवलं जातं.

समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलची मालकी कुणाकडे?

इंटरनेट समुद्राच्या तळाशी असलेल्या हजारो किलोमीटर लांबीच्या फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून पोहोचतं. समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर ऑप्टिक केबलची मालकी सरकारकडे नसते. म्हणजेच भारत सरकार किंवा अमेरिका सरकारकडे मालकी नसते. ऑप्टिक फायबर केबलची मालकी खासगी टेलिकॉम किंवा तंत्रज्ञान कंपन्या असतात. ज्यांच्याकडे आवश्यक पैसे, तंत्रज्ञान आणि संसाधनं असतात,त्याद्वारे ते समुद्राच्या तळाशी असलेल्या केबल्सची देखभाल करतात, त्याचा वापर करुन इंटरनेट डेटा जगभरात पाठवतात. भारतात ज्या कंपन्या अंडरसी केबल्स टाकण्याचं आणि चालवण्याचं काम करतात त्या देशातील इंटरनेट कनेक्शनचा आधार आहेत. या कंपन्यांमध्ये टाटा कम्युनिकेशन्स, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, सिफी टेक्नोलॉजीज आणि बीएसएनलचा समावेश आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.