MI ची फायनलची चावी CSK च्या खिशात, गुजरातने चेन्नईचा पराभव केला तर…; मुंबई फायनलला कशी पोहोचण

आयपीएल 2025: आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या (MI) क्वालिफायर 1 मध्ये पोहोचण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत. मात्र, यासाठी त्यांना इतर सामन्यांचे निकाल अनुकूल लागणे आवश्यक आहे, तसेच काही महत्त्वाची समीकरणे जुळून यावी लागतील. क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांपैकी एक गाठणे आवश्यक आहे. मुंबई इंडियन्स फायनलमध्ये कशी पोहोचू शकते? जाणून घ्या संपूर्ण गणित.

गुजरातने चेन्नईचा पराभव केला तर…

येत्या 26 मे रोजी मुंबई इंडियन्सचा (MI) शेवटचा साखळी सामना पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध होणार आहे. मुंबईला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. या विजयामुळे मुंबईचे 18 गुण होतील. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा (GT) शेवटचा सामना 25 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध आहे. जर GT ने हा सामना जिंकला, तर त्यांचे 20 गुण होतील आणि ते थेट गुणतालिकेच्या अव्वल स्थानी पोहोचतील, ज्यामुळे मुंबईसाठी टॉप-2 मध्ये प्रवेश करणं कठीण होईल. मात्र, जर CSK ने GT संघाचा पराभव केला तर तर GT चे गुण 18 वरच राहतील आणि मुंबईला अव्वल दोन स्थानांमध्ये येण्याची संधी मिळू शकते.

RCB चा पराभवही मुंबईसाठी आवश्यक

जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने 26 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धचा शेवटचा सामना जिंकला, तर त्यांच्या खात्यात 19 गुण जमा होतील (किंवा चांगल्या नेट रनरेटसह 19 गुण). अशा परिस्थितीत RCB चे स्थान मुंबई इंडियन्सपेक्षा वरचं असेल, त्यामुळे मुंबईसाठी टॉप-2 मध्ये पोहोचणं अधिक कठीण होईल. त्यामुळे RCB चा पराभवही मुंबईसाठी आवश्यक घटक ठरणार आहे.

इतर निकालांवरही मुंबईचं भवितव्य अवलंबून

जर मुंबई इंडियन्सने आपला शेवटचा सामना जिंकला आणि गुजरात टायटन्सने त्यांचा शेवटचा सामना गमावला, तर दोन्ही संघांचे 18 गुण होतील. सध्या मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट (NRR) +1.292 आहे, जो गुजरात टायटन्सच्या +0.602 NRR पेक्षा खूपच चांगला आहे. त्यामुळे गुण समान असतानाही, नेट रन रेटच्या आधारे मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सला मागे टाकून टॉप-2 मध्ये स्थान मिळवू शकतात. यामुळे, मुंबईसाठी अंतिम फेरी गाठण्याची संधी कायम राहते. परंतु ती इतर निकालांवरही अवलंबून आहे.

मुंबई इंडियन्स क्वालिफायर 1 जिंकून थेट फायनलमध्ये पोहोचणार का?

थोडक्यात सांगायचं झालं, तर मुंबई इंडियन्ससाठी आपला शेवटचा साखळी सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांनी आपले शेवटचे सामने गमावावेत, किंवा त्यांचा नेट रन रेट मुंबईपेक्षा खूपच कमी असावा, अशी परिस्थिती निर्माण होणं गरजेचं आहे. आता मुंबई इंडियन्स क्वालिफायर 1 जिंकून थेट फायनलमध्ये पोहोचणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.