गुजरातचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, मुंबईचं पुनरागमन, चेन्नई बाहेर; गुणतालिकेत मोठे उलटफेर, ऑरें
आयपीएल 2025 गुण सारणी: आयपीएल 2025 च्या हंगामात (IPL 2025) आतापर्यंत 39 सामने खेळण्यात आले आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स वगळता सर्व संघांनी 8-8 सामने खेळले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत (IPL 2025 Points Table) टॉप-4 मध्ये 3 संघ आहेत ज्यांनी अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही.
गुजरात टायटन्सचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित-
गुजरात टायटन्सने आयपीएलचा 39 वा सामना 39 धावांनी जिंकून प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. गुजरातचा संघ सध्या गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. गुजरातचे आता 6 सामने शिल्लक आहेत, त्यापैकी किमान 3 सामने जिंकायचे आहेत. गुजरातने 2 सामने जिंकले तरी प्लेऑफचं तिकीट पक्क करेल. मात्र कोणत्याही संघाच्या निकालांवर अवलंबून न राहायचे असल्यास गुजरातला 3 सामना जिंकावे लागतील. दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तिन्ही संघ त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी मैदानात आहेत. दिल्लीने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत, आरसीबी आणि पंजाबने 8-8 सामने खेळले आहेत आणि दोघांनीही 5-5 सामने जिंकले आहेत. जर या संघांनी आणखी 4 सामने जिंकले तर त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित मानला जाऊ शकतो.
मुंबई इंडियन्सकडून चांगले पुनरागमन-
लखनौ 8 सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. लखनौला 4 सामने जिंकावे लागतील पण त्यांना त्यांचा नेट रन रेटही थोडा सुधारावा लागेल. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सलग पराभवानंतर चांगले पुनरागमन केले आहे. सध्या मुंबईने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत, पुढील 6 सामन्यांपैकी किमान 5 सामने जिंकावे लागतील.
चेन्नई प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर-
चेन्नई सुपर किंग्सने 8 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत आणि ते स्पर्धेबाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. चेन्नईला उर्वरित सर्व 6 सामने जिंकावे लागतील, त्यानंतर त्यांचे १६ गुण होतील आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल. सध् चेन्नईचा संघ 10 व्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचीही हीच परिस्थिती आहे, त्यांनी 8 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे. केकेआरने 8 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत 7 व्या स्थानावर आहेत, त्यांना पुढील सर्व 6 सामने जिंकावे लागतील.
आयपीएल 2025 पॉइंट्स टेबल. 📈
– जीटी 12 गुणांसह निर्णय. pic.twitter.com/wwqkhiwm74
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 21 एप्रिल, 2025
सध्या ऑरेंज कॅप कोणाकडे? (orange cap in ipl 2025)
सध्या ऑरेंज कॅप साई सुदर्शनकडे आहे. गुजरात टायटन्सच्या या फलंदाजाने 8 सामन्यांमध्ये 52.12 च्या सरासरीने 417 धावा केल्या आहेत. लखनौचा निकोलस पूरन 368 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
पर्पल कॅप कोणाकडे? (purple cap in ipl 2025)
गुजरात टायटन्सच्या गोलंदज प्रसिद्ध कृष्णाकडे पर्पल कॅप आहे. त्याने 8 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर असलेला कुलदीप यादव 12 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.