IPL 2025 मोफत पाहण्याची संधी, फक्त एक काम करावं लागेल, ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर

मुंबई : आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. आयपीएलचं टीव्हीवरील प्रक्षेपण स्टार स्पोर्टसच्या चॅनेलवरुन केलं जाणार आहे. तर, डिजीटल मिडिया म्हणजेच मोबाईलवरील प्रक्षेपण जिओ हॉटस्टारवरुन केलं जात आहे. रिलायन्स जिओ त्यांच्या यूजर्सला मोबाइलवरुन मोफत लाइव्ह प्रक्षेपण पाहण्याची संधी देत आहे. आयपीएलच्या सुरुवातीलाच कंपनीनं शानदार ऑफर आणली आहे. मोबाईल रिचार्ज केल्यानंतर नव्या आणि जुन्या यूजर्सला जिओ हॉटस्टारवर मोफत मॅच पाहता येईल. ही ऑफर जिओ फायबरला आणि जिओएअर फायबरला देखील लागू असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल हे जाणून घेणं आवश्यक आहे.

रिलायन्स जिओची ऑफर

आयपीएल 2018 साठी नव्या ऑफरनुसार रिलायन्स जिओ 90 दिवसांसाठी त्यांच्या यूजर्सला जिओ हॉटस्टारचं मोफत सब्रस्क्रीप्शन देत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सला किमान 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. यामध्ये यूजर्सला दीड जीबी डेटा मिळतो. याशिवाय नव्या सीमकार्ड धारकांना देखील 299 किंवा त्याच्या अधिक किंमतीच्या रिचार्जवर जिओ हॉटस्टारचा मोफत लाभ मिळेल. जिओ फायबर आणि जिओएअरफायबरा 50 दिवसांसाठी फ्री ट्रायल दिली जात आहे.

मर्यादित काळासाठी ऑफर

जिओची ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. ही ऑफर 17 मार्च ते 31 मार्चदरम्यान वैध सेल. आता ते रिचार्ज करत असतील त्यांचा जिओहॉटस्टारचा पॅक 22 मार्चपासून सक्रिय होईल. ज्यांनी 17 मार्चपूर्वी रिचार्च केला असेल त्यांना 100 रुपयांचा अ‍ॅड-ऑन पॅक घ्यावा लागेल या यूजर्सला 4k क्वालिटीमध्ये आयपीएलच्या मॅचेसचं स्ट्रीमिंग पाहता येईल.

वीआयनं देखील आणली ऑफर

रिलायन्स जिओ प्रमाणं वोडाफोन आयडियानं देखील जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिपशन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.  त्या प्लानमध्ये 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचं सबस्क्रीप्शन मिळेल.याशिवाय दररोज अडीच जीबी डाटा आणि 100  एसएमएससह अनलिमिटेड कॉलिंग ची संधी उपलब्ध होईल.

दरम्यान, आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये होणार आहे.  कोलकाता नाईट रायडर्सनं 17 व्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळं यंदाचा पहिला सामना ईडन गार्डन्सवर होणार आहे.

इतर बातम्या :

भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण, विदेशी गुंतवणूकदारांचं कनेक्शन, दीड लाख कोटींची विक्री

अधिक पाहा..

Comments are closed.