Shreyas Iyer : श्रेयस अय्यर झाला पंजाब किंग्जचा कॅप्टन, नेतृत्त्व येताच म्हणाला….

श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा नवा कर्णधार: नव्या वर्षाच्या सुरुवातीनंतर आता सर्वांनाच यंदाच्या आयपीएल पर्वाची ओढ लागली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विशेष असणार? तसेच यावेळीच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नुकतेच आयपीएलचा पहिला सामना 23 मार्च रोजी होणार असल्याचं समोर आलंय. असे असतानाच आता पंजाब किंग्ज या संघाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या संघात कर्णधारपदासाठी खांदेपालट करण्यात आली असून संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे.

पंजाब किंग्जने केली अधिकृतपणे घोषणा

पंजाब किंग्ज या संघानेच श्रेयस अय्यरच्या निवडीची अधिकृतपणे घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या निवडीनंतर श्रेयसनेही आनंद व्यक्त केला असून आम्ही या वेळच्या हंगामात पूर्ण ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करू. आमचा संघ परिपूर्ण आहे, असं मत व्यक्त केलंय.

श्रेयस अय्यर होता कोलकाता संघाचा कॅप्टन

श्रेयस अय्यर हा भारतीय क्रिकेट संघातील एक आघाडीचा खेळाडू आहे. बॅट हातात घेऊन तो मैदानात उतरला की धावांचा पाऊस पडतो. त्यामुळेच यावेळी त्याला पंजाब किंग्ज संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. याआधी त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केलेले आहे. कोलकाता संघाने 2024 सालचे पर्व त्याच्याच नेतृत्त्वात खेळले होते.

पंजाब किंग्ज संघाने मोजले 26.75 कोटी रुपये

2024 सालच्या पर्वानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला रिलिज केले होते. त्यानंतर पंजाब किंग्ज संघाने संधी साध त्याला 26.75 कोटी रुपये देऊन संघात घेतले. त्याला संघात घेण्यासाठी यावेळच्या लिलावात त्याला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लागली.


श्रेयस अय्यर हा क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळलेला आहे.  विशेष म्हणजे 2024 सालच्या मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने मुंबई संघाचेही नेतृत्व केले होते. त्याच्याच नेतृत्त्वात मुंबई संघाने ही ट्रॉफी जिंकली होती. श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफीमध्येही खेळलेला आहे.

श्रेयस अय्यरने काय प्रतिक्रिया दिली?

पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद आल्यानंतर श्रेयसने प्रतिक्रिया दिली आहे. “संघाने माझ्यावर विश्वात ठेवला हा माझा सन्मानच आहे. संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या सोबत संघाला पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेन,” असं श्रेयस अय्यर म्हणाला.

हेही वाचा :

Cricketer and Actress : पाच अभिनेत्रींनी क्रिकेटर असलेल्या खेळाडूंसोबत केला होता विवाह, पण घटस्फोट घ्यायलाही वेळ लावला नाही

ठरलं रे ठरलं! IPL 2025 ची तारीख आली, ‘या’ दिवसापासून रंगणार थरार, BCCI च्या उपाध्यक्षांनीच केली घोषणा!

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे

अधिक पाहा..

Comments are closed.