IPL 2026 – 14 वर्षे झाली पण मुरली विजयचा हा विक्रम अजूनही अबाधित; यंदा मोडणार?
IPL 2026 चा धमाका उद्यापासून (28 मार्च 2026) सुरू होणार आहे. चौकार-षटकारांची आतषबाजी, गोलंदाजांची दादागिरी आणि श्रेत्ररक्षकांची चपळ कामगिरी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर अनेक विक्रम प्रस्थापित होतील तर काही जुने विक्रम मोडित निघतील. या सर्व धामधुमीत मुरली विजयचा एक विक्रम मागील 14 वर्षात एकाही हिंदुस्थानी खेळाडूला मोडता आलेला नाही.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 3 एप्रिल 2010 रोजी लढत रंगली होती. या सामन्यात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं ते मुरली विजयने. त्याने चौफेर फटकेबाजी करत 56 चेंडूंमध्ये 127 धावांची धुरळा उडवणारी फटेकबाजी केली अन् 11 षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्या या धमाकेदार खेळीमुळे चेन्नईने पाच गड्यांच्या मोबदल्यात 246 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात राजस्थानला आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयश आलं आणि चेन्नईचा संघ 23 धावांनी विजयी झाला.
भुवनेश्वर कुमार इतिहास रचणार? IPL 2026 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरू शकतो पहिला वेगवान गोलंदाज
या सामन्यात मुरली विजने आपल्या तळपत्या बॅटीतून 11 षटकार ठोकले होते. त्याचा हा विक्रम मागील 14 वर्षात एकाही हिंदुस्थानी फलंदाजाला मोडता आलेला नाही. रोहित शर्मा, संजू सॅसमन, हार्दिक पंड्या, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव सारख्या विस्फोटक फलंदाजांनाही हा विक्रम मोडित काढता आलेला नाही. मात्र, यंदाच्या हंगामात हा विक्रम मोडित निघतो का हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
Comments are closed.