IPL 2026 – फक्त तीन शब्दांत वातावरण टाईट! हैदराबादला चोपल्यानंतर वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. बेधडक फलंदाजी करणाऱ्या या 15 वर्षांच्या मुलाने दिग्गज गोलंदाजांचा अक्षरश: चोपून काढलंय. बुधवारी (27 मे 2026) झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट पुन्हा एकदा एखाद्या भुकेल्या सिंहाप्रमाणे धडाडली. 5 चौकार आणि 12 षटकारांची बरसात करत त्याने 29 चेंडूंमध्ये 97 धावांची वादळी खेळी केली. अवघ्या एका धावाने ख्रिस गेलचा विक्रम मोडता मोडता राहिला. गोलंदाजांना धडकी भरवणाऱ्या या खेळीनंतर वैभव सूर्यवंशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

राजस्थान रॉयल्सचा क्वालिफायर-2 सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशीने आता आपल्या पोस्टने चाहत्यांच लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यातील काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंना त्याने तीन शब्दांच कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय “Hungry For More” म्हणजेच अजून मी भुकेला आहे, असं तो म्हणाला आहे. हा एक प्रकारे गुजरात टायटन्सला इशारा असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. वैभवने अगदी तीन शब्दांमध्ये आपल्या धारधार फलंदाजीला अधोरेखित केलं..

दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये क्वालिफायर-2 चा सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ विजीय होईल तो संघ फायनलमध्ये धडक मारेल. फायनलमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या RCB ला कडवी झुंज देण्याच आव्हान क्वालिफायर-2 मधील विजयी संघाला असेल.

रणजीत मेहनत, पण IPL खेळल्याशिवाय पुढे जाणे अवघड; सिद्धेश लाडने मांडले कडू सत्य

Comments are closed.