'आता मी तरुण नाही; वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाला प्राधान्य….', पराभवानंतर भुवनेश्वरची खंत

आयपीएल 2026 मध्ये आरसीबीचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार शानदार फॉर्ममध्ये आहे. अचूक आणि प्रभावी गोलंदाजी करत तो सध्या या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला असून पर्पल कॅप त्याच्याकडे आहे.

गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात भुवनेश्वरने 28 धावा देत 3 बळी घेतले. या हंगामात त्याने पाचव्यांदा 3 बळी घेण्याची कामगिरी केली. मात्र, त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतरही आरसीबीला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

सामन्यानंतर बोलताना भुवनेश्वर कुमार म्हणाला की, आता तो करिअरच्या अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे वैयक्तिक यशापेक्षा संघाचं यश अधिक महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, “पर्पल कॅप मिळणं चांगलं आहे, पण आता वैयक्तिक पुरस्कारांपेक्षा संघासाठी योगदान देणं जास्त महत्त्वाचं वाटतं. मी आता तरुण नाही. तरुणपणी असे पुरस्कार जिंकण्याची इच्छा असते, पण आता संघाचं यश महत्त्वाचं आहे.”

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना फक्त 155 धावा केल्या. सध्याच्या स्पर्धेत मोठे लक्ष्य सहज गाठले जात असल्याने हा धावसंख्या बचावणे कठीण होते. याबाबत भुवनेश्वर म्हणाला, “या हंगामात कोणत्याही मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे झाले आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे आणि दवाचाही परिणाम होतो. आम्ही नाणेफेक जिंकू शकलो नाही, त्यामुळे आधी फलंदाजी करावी लागली. आम्ही गोलंदाजीत पूर्ण प्रयत्न केला, पण सामना हरलो.”

रणनीतीबाबत तो म्हणाला, “परिस्थिती पाहता वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळत होती आणि आमच्याकडे तिसरा वेगवान गोलंदाज होता. त्यामुळे आम्ही बळी घेण्यावर भर दिला. फक्त धावा रोखून सामना जिंकता येत नव्हता, बळी घेणं गरजेचं होतं.”

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या डावात आरसीबीने सर्व गडी गमावून 155 धावा केल्या. योग्य अंतरावर विकेट्स गेल्याने आरसीबी मोठी धावसंख्या गाठता आली नाही. देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 40 धावा केल्या. गुजरातकडून गोलंदाजीत अर्शद खान63 बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात कडून शुबमन गिल 18 चेंडूत 43 धावा ठोकल्या शिवाय जोस बटलरनेही 39 धावांची खेळी केली. अशाप्रकारे गुजरातने 25 चेंडू राखून सामना जिंकला.

Comments are closed.