IPL 2026 – दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; सराव सत्रात खेळाडू जखमी, रुग्णवाहिकेतून नेले रुग्णालयात
अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी (दि.24) सराव सत्रादरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) एका खेळाडूला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सराव करत असताना एक चेंडू थेट या खेळाडूच्या तोंडावर लागला, ज्यामुळे तो मैदानावरच कोसळला. प्राथमिक उपचार केल्यानंतर या खेळाडूला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सरावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या एका तरुण खेळाडूच्या चेहऱ्यावर चेंडू लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जमिनीवर रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला स्ट्रेचरवर बसवून रुग्णालयात नेण्यात आले.
मला आशा आहे की तो ठीक आहे आणि त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. pic.twitter.com/JX8Xjl6YOW
— ⁴⁵ (@rushiii_12) 24 एप्रिल 2026
जखमी झालेला खेळाडू नेमका कोण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, तो 18 वर्षीय साहिल पारख असावा अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. साहिलला दिल्लीने आयपीएल 2026 च्या लिलावात खरेदी केले होते, पण त्याला अजून पदार्पणाची संधी मिळालेली नाही. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा मोठा झटका मानला जात आहे, कारण संघ आधीच बेन डकेट आणि मिचेल स्टार्क यांच्या दुखापतींमुळे अडचणीत आहे. या घटनेवर फ्रँचायझी लवकरच अधिकृत पत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
Comments are closed.