पाकिस्तानची जगात नाचक्की! आधीच डबघाईला आलेल्या PSL ला बांगलादेशने दाखवला ठेंगा; नेमकं काय घडलं?

PSL 2026 : पीएसएल 2026 म्हणजेच पाकिस्तान सुपर लीगचा हा हंगाम आता अक्षरशः वाद आणि गोंधळांनी भरलेला दिसत आहे. स्पर्धेदरम्यान दररोज काही ना काही धक्कादायक घडामोडी समोर येत असून, जगभरातील क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसत आहे. यात आता आणखी एक मोठी घटना घडली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मध्य स्पर्धेतच मोठा झटका दिला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानला अडचणीत आणले आहे. नेमकं बांगलादेशने पाकिस्तानसोबत काय केलं? हा निर्णय इतका वादग्रस्त का ठरतोय? यामागचं संपूर्ण प्रकरण आपण सविस्तर पाहूया…

बांगलादेशने पाकिस्तानला दिला ‘नकार’

पाकिस्तान सुपर लीग 2026 मध्ये सहभागी असलेल्या बांगलादेशच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना अचानक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेली ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) परत घेतल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. मुस्तफिजुर रहमान आणि नाहिद राणा हे दोघे अनुक्रमे लाहोर कलंदर्स आणि पेशावर झाल्मी संघांकडून खेळत होते. मात्र, बीसीबीच्या निर्णयामुळे ते आता पीएसएल 2026 मध्ये पुढे खेळणार नाहीत. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुस्तफिजुर रहमान दुखापतीमुळे बाहेर

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी हे दोन्ही खेळाडू मायदेशी परतले होते. त्या दरम्यान मुस्तफिजुर रहमान गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. पहिल्या दोन वनडेमध्ये तो खेळू शकला नाही, मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन करत 5 विकेट्स घेतल्या. पण, त्याच्या फिटनेसचा विचार करून त्याला पुन्हा पाकिस्तानमध्ये पीएसएलसाठी जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

नाहिद राणा ‘वर्कलोड मॅनेजमेंट’मुळे विश्रांतीवर

दुसरीकडे, नाहिद राणाला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी टी20 मालिकेचा विचार करून त्याला सुरुवातीच्या सामन्यांतूनही बाहेर ठेवण्यात आले आहे. बीसीबीने स्पष्टपणे सांगितले की, न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेनंतर हे दोन्ही खेळाडू पुन्हा पाकिस्तानला जाणार नाहीत.

पाकिस्तानसाठी मोठा धक्का

पीएसएल 2026 दरम्यान अशा प्रकारे दोन महत्त्वाचे विदेशी खेळाडू गमावणे, हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी नक्कीच चिंतेचे कारण ठरले आहे. या निर्णयामुळे लीगच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्यूझीलंड टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बांगलादेशचा संघ

लिटन दास (कर्ंधर, यष्टिरक्षक), सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तनजी हसन, शमीम हुसैन, तौहीद ह्रदोय, नुरुल हसन, महेदी हसन, नसुम अहमद, रिशाद हुसेन, शॉरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकीब, रिपन मंडोल, मोहम्मद सैफुद्दीन, ग़ाफउद्दीन, अब्दुल शेख.

हे ही वाचा –

Sai Sudharsan Century : साईचं ‘सुदर्शन चक्र’ फिरलं! जो आडवा आला तो थेट बाउंड्रीपार गेला, ठोकले तुफानी शतक, युनिव्हर्स बॉसचं सिंहासन एका फटक्यात उद्ध्वस्त

आणखी वाचा

Comments are closed.