IPL 2026 – देवदत्त अन् किंग कोहलीची दमदार फटकेबाजी; 206 धावांचा डोंगर फोडत RCB ने गुजरातचा फडशा पाडला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात साई सुदर्शनच्या झुंजार फटकेबाजीने चाहत्यांची मन जिंकली. त्याने 58 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने शतकीये खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यामुळे गुजरातने बंगळुरूला जिंकण्यासाठी 206 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात बंगळुरूला पहिला हादरा 26 या धावसंख्येवर बसला. त्यामुळे संघ काहीचा अडचणीत आला होता. मात्र, किंग कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाची सुत्र आपल्या हाती घेत गुजरातच्या गोलंदाजांना चोपून काढण्यास सुरुवात केली. कोहलीने (81) आणि पडिक्कलने (55) धावांची खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेलं आणि अखेरच्या षटकांमध्ये कृणाल पंड्या आणि टीम डेव्हिड यांनी गुजरातला पराभवाची धुळ चारली.

Comments are closed.