खाद्यतेलापासून तयार होतोय ‘पनीर ’सदृश पदार्थ, अन्न प्रशासनाचा मोठा खुलासा
पनीर खाणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे हॉटेल, रेस्टॉरंट आणि फास्टफूड सेंटरमध्ये मिळणारे पनीर खरोखरच शुद्ध आहे की त्याऐवजी ‘चीज अॅनालॉग’ वापरले जात आहे, याबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. पनीरची वाढती मागणी आणि उत्पादनातील तफावत यामुळे काही व्यावसायिकांकडून पनीरऐवजी स्वस्त ‘चीज अॅनालॉग’चा वापर केल्या जात असल्याचे समोर आले आहे.
पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केले जाते आणि ते शरीरासाठी पोषक मानले जाते. मात्र ‘चीज अॅनालॉग’ हा पदार्थ खाद्यतेल, इमल्सिफायर, स्टार्च आणि इतर घटकांपासून तयार केला जातो. दिसायला आणि चवीला पनीरसारखा वाटत असल्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे मात्र आता ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. पनीरऐवजी ‘चीज अॅनालॉग’ वापरणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, फास्टफूड सेंटर आणि केटरर्सना त्याचा स्पष्ट उल्लेख मेनू कार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर करणे बंधनकारक राहणार आहे. येत्या १ मेपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
Comments are closed.