पाण्याचं कॅन भरायला गेलेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत; ST बसच्या धडकेत दोन ठार, शेकडो नागरिक जमल

भंडारा: राज्यातील अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. कधी रस्ते तर कधी वाहनचालकांच्या वाहनाची गती हेच रस्ते अपघाताचे अनेकदा प्रमुख कारण ठरते. भंडारा (Bhandara) शहरात अशीच अपघाताची (Accident) घटना घडली असून या दुर्घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. एसटी बसनं दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना भंडारा येथील एसटी डेपो परिसरात घडली. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेकाचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेत पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

भंडारा शहरातील एसटी डेपोच्या आवारात रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मृतक हे भंडारा शहरातील चांदणी चौकातील येथील रहिवाशी आहेत. रोहित खेडकर (30) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर असं या अपघातात मृत बालकांचं नावं आहे. मृतक रोहित यांचा पाण्याच्या आरो प्लांटचा व्यवसाय असून ते भंडारा शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. खाली झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी बापलेक दुचाकीनं एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बसने दुचाकीला धडक दिली, यात दोघांचाही घटनास्थळीचं मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहरातील शेकडो नागरिक घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालय जमा झाले होते. एसटी डेपो परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक जमा झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त एसटी डेपो परिसरात तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : दरोडेखोर महिलांचा मोठा कट उधळला, सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 9 महिलांची टोळी पकडली, सर्वजणी धाराशिवच्या!

आणखी वाचा

Comments are closed.