Ratnagiri News – कायदेशीर लढाई लढत प्रगती भोसले पुन्हा भगवतीनगरच्या सरपंचपदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रशासकीय अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांना सरपंच पदावरून हटवण्यात आलेल्या रत्नागिरी तालुक्यातील भगवती नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रगती भोसले यांनी अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देत आपले सरपंचपद पुन्हा प्राप्त केले आहे. त्यांनी मोठ्या उत्साहात आपला पदभार पुन्हा स्वीकारला.

प्रगती भोसले या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आहेत. भगवतीनगर सरपंचपदी निवडून आल्या होत्या. प्रशासकीय अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांना दोनवेळा सरपंच पदावरून बाजूला करण्यात आले होते. मात्र खचून न जाता प्रगती भोसले यांनी न कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवला. प्रशासकीय आरोप खोडून काढत आपले सरपंच पद पुन्हा प्राप्त केले.

लोकशाहीचा हा विजय साजरा करत प्रगती भोसले यांनी पुन्हा सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील, उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव व सुभाष रहाटे, आणि विभाग प्रमुख उत्तम मोरे यांनी उपस्थित होते.

Comments are closed.