IPL 2026: अंतिम सामन्याचे ठिकाण झाले निश्चित, एकही प्लेऑफचा सामना बंगळुरूमध्ये नाही? धर्मशालेची लागली लॉटरी
आयपीएल २०२६ हंगामाचे साखळी सामने संपत आले आहेत. हंगामाच्या प्लेऑफच्या सामन्यांच्या संबंधित एक मोठे वृत्त समोर येत आहे. आयपीएल १९ चा अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न खेळता तो आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
आयपीएलच्या गतविजेत्याच्या घरच्या मैदानावर पुढील हंगामाचा सामना खेळला जातो, मात्र यावेळी तसे होणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली होती. यामुळे २०२६ च्या हंगामाचा अंतिम सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार असे निश्चित असताना आता त्यामध्ये बदल झाला आहे.
आयपीएल २०२६ चा अंतिम सामना आता अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. तसेच क्वालिफायर आणि एलिमिनेटरच्या सामन्यांच्या ठिकाणांमध्येही बदल झाले आहेत. क्वालिफायर १, २६ मे ला धर्मशालामध्ये खेळला जाणार असून एलिमिनेटर (२७ मे) आणि क्वालिफायर २ (२९ मे) हे दोन्ही सामने मुल्लाणपूर, चंदीगडमध्ये खेळले जाणार आहेत.
अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्यामागे आमदारांचा तिकीटांचा वाद कारणीभूत आहे. हा वाद हंगाम सुरू होण्याआधी निर्माण झाला होता. लोकप्रतिनीधी हे व्हीआयपी असून त्यांना तिकिटांसाठी रांगेत थांबावे लागू नये, यासाठी प्रत्येक आमदाराला आयपीएल सामन्यांची किमान पाच तिकीटे मिळावीत अशी जाहीर मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रत्येक आमदाराला तीन तिकीटे देणार असे जाहीर केले होते. ती तिकीट केवळ आमदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच वापरता येतील असे कर्नाटच्या गृहमत्र्यांनी जाहीर केले, मात्र तरीही प्रकरण काही निवळले नाही. यामुळेच आता चिन्नास्वामी स्टेडियमची अंतिम सामना आयोजित करण्याची संधी गेली आहे.
आयपीएल २०२६ अंतिम सामना आणि प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक-
पात्रता 1 – 26 मे 2026, धर्मशाला
एलिमिनेटर – 27 मे 2026, चंदीगड
क्वालिफायर २ – २९ मे २०२६, चंदीगड
अंतिम सामना – 31 मे 2026, अहमदाबाद
Comments are closed.