IPL 2026 – प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर; 5 वर्षांत चौथ्यांदा फायनल अहमदाबादला, गतविजेत्या बंगळुरूला धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. बीसीसीआयने यंदाही फायनलचे दान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानाच्या झोळीत टाकले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा आयपीएलची फायनल अहमदाबादला होणार आहे. याआधी 2022, 2023, 2025 मधील अंतिम सामनाही अहमदाबाद येथे झाला होता.

यंदाचे प्लेऑफचे सामने दोन ऐवजी तीन शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. 26 मे रोजी धर्माशाळा येथे क्वालिफायर-1 सामना (गुणतालिकेतील पहिले दोन संघ) खेळला जाईल. त्यानंतर 27 मे रोजी न्यू चंदिगडच्या मैदानावर एलिमिनेटर सामना (गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघ) होईल. 29 मे रोजी न्यू चंदिगडच्या मैदानावर क्वालिफायनर-2 आणि त्यानंतर 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर अंतिम सामना होईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Comments are closed.