IPL 2026: केकेआरचे शानदार पुनरागमन! अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा प्लेऑफच्या शर्यतीत
काही आठवड्यांपूर्वीपर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata knight riders) आयपीएल 2026 मधील आव्हान संपल्यात जमा मानले जात होते. संघाने सुरुवातीचे सहाही सामने गमावले होते आणि प्लेऑफच्या आशा मावळल्या होत्या. मात्र, आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. अजिंक्य रहाणेच्या कप्तानीखाली केकेआरने जबरदस्त मुसंडी मारत टॉप-4 च्या शर्यतीत पुनरागमन केले आहे.
च्या
8 मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. हा त्यांचा सलग चौथा विजय होता. दिल्लीने दिलेले 143 धावांचे लक्ष्य तीनवेळा चॅम्पियन राहिलेल्या कोलकाता संघाने अवघ्या 14.2 षटकांत पूर्ण केले. वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि अनुकूल रॉय या फिरकी त्रिकुटाने दिल्लीच्या फलंदाजांना रोखून धरले. त्यानंतर फिन ॲलनने अवघ्या 47 चेंडूंत झंझावाती शतक झळकावून सामना एकतर्फी केला.
च्या
सुरुवातीच्या पराभवानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वावर टीका होत होती. मात्र, आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याने शांतपणे संघाला सावरले आणि पुन्हा विजयाच्या मार्गावर आणले. IPL 2026 मध्ये 10 संघ खेळत आहेत. नियमानुसार, ज्या संघाकडे 16 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतात, तो संघ नेट रन रेटची चिंता न करता थेट प्लेऑफमध्ये पोहोचतो. सलग चार विजयांनंतर केकेआर आता गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जर केकेआरने त्यांचे उर्वरित चारही सामने जिंकले, तर त्यांचे 17 गुण होतील आणि ते सहज प्लेऑफमध्ये पात्र ठरतील. मात्र, एकही सामना हरल्यास त्यांना नेट रन रेट आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
च्या
केकेआरचा पुढचा महत्त्वाचा सामना 13 मे रोजी रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकणे केकेआरसाठी प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
Comments are closed.