IPL 2026 – धोनीबाबतचा मूर्खपणा; चेन्नईच्या संघाने थांबवायला हवा, कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी आयपीएल संघाला झोडपले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याची उत्सुकता चाहत्यांना होती. धोनी खेळला नाही की, तो पुढच्या सामन्यासाठी तंदुरुस्त होत असल्याचे संघाकडून सांगितले जात होते. पण धोनी काही या आयपीएलमध्ये खेळलाच नाही. त्यामुळे हिंदुस्थानचे माजी विश्वविजेते क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत चांगलेच भडकले असून त्यांना चेन्नईच्या संघाला चांगलेच झोडपले आहे. चेन्नईच्या संघाने धोनीबाबतचा हा मूर्खपणा थांबवायला हवा, असा स्ट्रेट ड्राईव्ह त्यांनी लगावला आहे.

'धोनीची उणीव भासत नाही…'

श्रीकांत पुढे म्हणाले की, ‘मला स्पष्टपणे वाटते की, धोनीचे युग आता संपले आहे. त्याच्यामध्ये क्रिकेट शिल्लक राहिलेले नाही. माझ्या मते धोनीची उणीवही संघाला भासत नाही. फक्त धोनी दिसत नाही, एवढाच प्रश्न सर्वांना पडतो, त्याच्या खेळण्याबाबतही तेवढी उत्सुकता राहिलेली नाही. त्यामुळे चेन्नईच्या व्यवस्थापनाने चाहत्यांना मूर्ख न बनवता धोनीबाबत स्पष्ट गोष्टी सांगायला हव्यात. चेन्नईचे व्यवस्थापन जर असेच करत राहिले तर त्यांच्यावरचा चाहत्यांचा विश्वास एक दिवस उडून जाईल.’

श्रीकांत यांनी नेमकं काय म्हटलं

धोनीबाबत श्रीकांत म्हणाले की, ‘धोनीबाबत चेन्नईच्या व्यवस्थापनाने स्पष्ट भूमिका मांडायला हवी होती. पण प्रत्येक सामन्यानंतर ते चाहत्यांमध्ये धोनीच्या पुनरागमनाची उत्सुकता निर्माण करत होते. धोनीचा नेट्समधील सराव करतानाचा व्हिडीओ दाखवून ते चाहत्यांना फसवत होते. त्यानंतर धोनीला दुखापत झाली आहे, असेही त्यांनी पसरवले. मला वाटते की, चेन्नईच्या संघाने धोनीबाबतचा हा मूर्खपणा थांबवायला हवा. पण संघ व्यवस्थापनाने चाहत्यांच्या मनाशी खेळ चालवला. ऋतुराज गायकवाडही सांगत होता की, धोनी पुढच्या सामन्यात खेळणार आहे.’

धोनीबाबत चेन्नईच्या संघाने काय केले

धोनीला दुखापत असल्याचे चेन्नईच्या संघाने सुरुवातीला सांगितले. त्यानंतर धोनीच्या सरावाचा व्हिडीओ त्यांनी व्हायरल केले. त्यामुळे धोनी आता पुढच्या सामन्यात खेळेल ही उत्सुकता त्यांची चाहत्यांमध्ये वाढवली. कर्णधार ऋरतुराज गायकवाडला टॉसनंतर विचारल्यावर तोदेखील धोनी पुढच्या सामन्यात खेळेल, असे म्हणून उत्सुकता शिगेला पोहोचवायचा. पण चेन्नईचा संघ आणि ऋतुराज यांनी चाहत्यांची घोर फसवणूक केल्याचे आता म्हटले जात आहे. धोनी अखेरच्या साखळी सामन्यात खेळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण सामना अहमदाबादला असताना तो थेट रांचीलाच निघून गेला होता.

Comments are closed.