MS धोनी OUT! CSK च्या गोटात खळबळ; ‘थाला’विना मैदानात उतरणार चेन्नई, नेमकं घडलं काय?

एमएस धोनी 2 आठवडे IPL 2026 साठी बाहेर : आयपीएलच्या (IPL 2026) सुरुवातीलाच चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एमएस धोनीला (MS Dhoni)  दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) शनिवार 28 मार्च रोजी अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली.

धोनीला नेमकी काय दुखापत झाली?

चेन्नईच्या निवेदनानुसार, धोनी सध्या पिंडरीच्या स्नायूमध्ये ताण (Calf Strain) या दुखापतीवर उपचार घेत आहेत. ते सध्या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत असून, किमान दोन आठवडे मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे महत्त्वाचे सामने मिस होणार आहेत. धोनीच्या अनुपस्थितीत CSK ला सुरुवातीचे 4 सामने त्याच्याविना खेळावे लागणार आहेत.

पहिला सामना 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. गुवाहाटीतील या सामन्यानंतर संघ 3 एप्रिल रोजी घरच्या मैदानावर पंजाब किंग्सविरुद्ध खेळेल. त्यानंतर 5 एप्रिल रोजी आरसीबी आणि 11 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामने होतील. हे चार सामने पुढील दोन आठवड्यांत होणार आहेत. या चार सामन्यांमध्ये धोनीची अनुपस्थिती CSK साठी मोठा धक्का मानली जात आहे.

पुनरागमन कधी होणार?

चेन्नईच्या वेळापत्रकानुसार, 14 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना आहे. मात्र, त्यावेळीही धोनी पूर्णपणे फिट नसल्यास ते हा सामना देखील चुकवू शकतात. ते 18 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात पुनरागमन करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

धोनीसाठी खास IPL सिझन

44 वर्षीय धोनी यांच्यासाठी हा आयपीएल हंगाम विशेष मानला जात आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हा शेवटचा आयपीएल सिझन असू शकतो, अशी चर्चा आहे. त्यांनी CSK ला आपल्या नेतृत्वाखाली तब्बल 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच त्यांनी 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

चेन्नई सुपर किंग्स IPL 2026 संपूर्ण वेळापत्रक (CSK IPL Schedule 2026)

तारीख चेहरा ठिकाण वेळ (IST)
30 मार्च राजस्थान रॉयल्स विरुद्ध CSK गुवाहाटी संध्याकाळ. ७:३०
०३ एप्रिल CSK विरुद्ध पंजाब किंग्ज चेन्नई संध्याकाळ. ७:३०
०५ एप्रिल RCB विरुद्ध CSK बंगळुरू संध्याकाळ. ७:३०
११ एप्रिल CSK vs दिल्ली कॅपिटल्स चेन्नई संध्याकाळ. ७:३०
१४ एप्रिल CSK vs कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई संध्याकाळ. ७:३०
१८ एप्रिल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध CSK हैदराबाद संध्याकाळ. ७:३०
२३ एप्रिल मुंबई इंडियन्स विरुद्ध CSK (एल-क्लासिको) मुंबई संध्याकाळ. ७:३०
२६ एप्रिल गुजरात टायटन्स vs CSK अहमदाबाद दुपारी ३:३०
02 मध्ये CSK वि मुंबई इंडियन्स चेन्नई संध्याकाळ. ७:३०
05 मध्ये दिल्ली कॅपिटल्स vs CSK दिल्ली संध्याकाळ. ७:३०
10 मध्ये CSK विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स चेन्नई दुपारी ३:३०
15 मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध CSK लखनौ संध्याकाळ. ७:३०
18 मध्ये CSK विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद चेन्नई संध्याकाळ. ७:३०
21 मध्ये CSK vs गुजरात टायटन्स चेन्नई संध्याकाळ. ७:३०

हे ही वाचा –

IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती

आणखी वाचा

Comments are closed.