सलग 4 कॅच सोडले! पंजाब किंग्जच्या 'या' खेळाडूमध्ये सुधारण्याची चिन्हेच दिसेना, प्रीती झिंटासह रिकी पॉटींगही भडकले
आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्जची कामगिरी आतापर्यंत खूपच जबरदस्त राहिली आहे. त्यांनी या हंगामात एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत असताना एक खेळाडू मात्र संघ व्यवस्थापकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्याने सातत्याने खराब क्षेत्ररक्षण करत आहे. त्याने आजच्या (२५ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातही तसेच केले. त्याचे हे सततचे ढीसाळ क्षेत्ररक्षण पाहून पंजाबचा वेगवान गोलंदाजी अर्शदीप सिंग खूप संतापला होता.
डीसीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिसऱ्या षटकातील एका क्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. अर्शदीपने डीसीचा सलामीवीर केएल राहुलला एक शॉर्ट बॉल टाकला. राहुलने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. तो चेंडू उंच जाऊन डीप स्क्वेयर लेगच्या दिशेने गेला. तो झेल सोपा वाटत होता. त्यावेळी पीबीकेएसचा क्षेत्ररक्षक शशांक सिंग सीमारेषेजवळ चांगल्या स्थितीत होता, मात्र चेंडू त्याच्या हातातून निसटून सीमारेषेबाहेर गेला. विकेट मिळाल्याचे वाटताना अर्शदीपने जल्लोष केला, पण जेव्हा झेल सुटला तेव्हा त्याचा उत्साह हरपला आणि तो चिढलेला दिसला.
राहुल त्यावेळी ६ चेंडूत १२ धावांवर खेळता होता. पुढे त्याने नाबाद १५२ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे डीसीने २० षटकात २ विकेट्स गमावत २६४ धावसंख्या उभारली.
शशांकने मागील सामन्यातही असेच अनेक सोपे झेल सोडले होते. त्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात एक नाही तर तब्ब्ल तीन झेल सोडले होते. डीसीविरुद्धही त्याने झेल सोडत सुरूवात केली. यामुळे सलग दोन सामन्यात त्याने चार झेल सोडले. यादरम्यान त्याने एकही झेल घेतला नाही. त्याचे हे सतत केलेले वाईट क्षेत्ररक्षण पाहून पीबीकेएसची मालक प्रीती झिंटा आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटींग नाराज दिसले.
शशांकने एलएसजीविरुद्ध १४ व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर निकोलस पूरन, १८ व्या षटकात अर्शदीपच्या गोलंदाजीवर एडन मार्करम आणि १९ व्या षटकात मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर मुकुल चौधरी यांचे झेल सोडले होते.
Comments are closed.