संजू ऑरेंज कॅप, बुमराह पर्पल कॅप…, प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या 4 टीमही सांगितल्या; IPL 2026 च्या

आयपीएल 2026 प्लेऑफसाठी आकाश चोप्राची भविष्यवाणी : आयपीएलचा थरार 28 मार्चपासून रंगणार आहे आणि सध्या या स्पर्धेबाबत अनेक क्रिकेट तज्ज्ञ आपापले अंदाज मांडताना दिसत आहेत. कुणी प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलत आहे, कुणी विदेशी खेळाडूंच्या कॉम्बिनेशनवर भाष्य करत आहे. पण या सगळ्यात एक आवाज थोडा वेगळा, थोडा ठाम ऐकू येतोय. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, एमर्जिंग प्लेयर आणि प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

आयपीएल 2026 प्लेऑफसाठी आकाश चोप्राची भविष्यवाणी

क्रेक्स लाइव्हशी संवाद साधताना चोप्रांनी रॅपिड फायरदरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याच्या मते, संजू सॅमसन (Sanju Samson) यंदा ऑरेंज कॅप जिंकू शकतो, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पर्पल कॅप पटकावू शकतो. टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सॅमसनने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या, तर बुमराहने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आयपीएलमध्येही हे दोघे आपली दमदार कामगिरी कायम ठेवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टूर्नामेंटचा उदयोन्मुख खेळाडू कोण आहे? (IPL 2026 इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट)

एमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंटसाठी चोप्रांनी वैभव सूर्यवंशी याचे नाव घेतले. राजस्थान रॉयल्सकडून यंदा तो स्पेशालिस्ट ओपनर म्हणून खेळणार आहे. गेल्या हंगामात मधल्या टप्प्यात पदार्पण करत त्याने शतक झळकावत जबरदस्त छाप पाडली होती. मागील वर्षभरात त्याने इतकी प्रभावी कामगिरी केली की तो सर्वाधिक सर्च होणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये गणला गेला.

कोण जिंकणार आयपीएल 2026? (Who will win IPL 2026?)

प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघांबाबत चोप्रांनी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघांची निवड केली. मात्र विजेत्याबाबत त्यांनी सावध भूमिका घेत “जो संघ चांगला खेळेल तोच विजेता ठरेल,” असे सांगितले. तरीही, नवीन विजेता पाहण्याची इच्छा व्यक्त करत त्याने दिल्ली कॅपिटल्सकडे झुकतं माप दिलं. (Aakash Chopra prediction for IPL 2026 Playoffs)

हे ही वाचा –

James Foster CSK Fielding Coach : चेन्नई सुपर किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल; इंग्लंडच्या माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

आणखी वाचा

Comments are closed.