मुंबई इंडियन्सचा एका विजयाने सगळं चित्र बदललं; आयपीएलच्या Points Table मध्ये उलथापालथ

आयपीएल 2026 गुण सारणी: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने गुजरातला तब्बल 99 धावांनी पराभूत केले. मुंबईच्या तिलक वर्मा (Tilak Verma) याला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. तिलक वर्माने 45 चेंडूत 101 धावा केल्या. (Gujarat Titans vs Mumbai Indians)

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल 2026 च्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. मुंबईच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलटफेर झाली आहे. मुंबई गुणतालिकेत अगदी तळाशी 10 व्या स्थानावर होती. गुजरातविरुद्धच्या विजयानंतर मुंबई आता थेट सातव्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईने सहा सामन्यात दोन विजय मिळवले असून 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचे सध्या 4 गुण आहेत. विशेष म्हणजे, या मोठ्या विजयामुळे मुंबईला ‘नेट रन रेट’च्या बाबतीतही लक्षणीय फायदा झाला आहे.

गुजरात टायटन्स सहाव्या स्थानावर- (Mumbai Indians vs Gujarat Titans)

पराभव होऊनही, गुजरातने आपले 6 वे स्थान कायम राखले आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वीही याच स्थानावर होता. गुजरातने सहा सामने खेळले असून, त्यापैकी तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. परिणामी, संघाकडे सध्या 6 गुण आणि -0.821 असा नेट रनरेट आहे.

पंजाब किंग्स अव्वल स्थानावर- (IPL 2026 Points Table)

गुणतालिकेत सध्या पंजाब किंग्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या, राजस्थान रॉयल्स तिसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहेत. या अव्वल चार संघांचे गुण अनुक्रमे 11, 08, 08 आणि 06 असे आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर, गुजरात सहाव्या, मुंबई सातव्या, चेन्नई आठव्या, लखनौ नवव्या आणि केकेआर दहाव्या स्थानावर आहे.

आज हैदराबाद आणि दिल्लीत सामना- (SRH vs DC)

सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यातही आपल्या विजयाची मालिका कायम राखण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघही दमदार कामगिरी करण्याचे उद्दिष्टाने मैदानात उतरेल.

संबंधित बातमी:

GT Vs MI IPL 2026 : शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या ‘पलटण’ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा

आणखी वाचा

Comments are closed.