पंजाबी टीव्ही होस्टला कॅनडात तुरुंगात शिक्षा

डफल बॅगमधून करत होती ड्रग्ज तस्करी

न्यूज एजन्सी / ओटावा

कॅनडात मागील 10 वर्षांपासून पंजाबी रेडिओ आणि टीव्ही होस्ट म्हणून काम करणारी 47 वर्षीय सुखविंदर कौर संघाला ड्रग्ज तस्करीप्रकरणी 5 वर्षे 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुखविंदरला 2021 मध्ये अमेरिकेमधून मेथची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले होते. सुखविंदरने न्यायालयासमोर स्वत:चा गुन्हा मान्य केला होता.

तस्करी करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 1-10 दशलक्ष डॉलर्सदरम्यान असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला होता. तर सुखविंदरने हा गुन्हा धमकीपोटी केला होता. तिला मुलाला नुकसान पोहोचविण्याची धमकी देत 1.5 लाख डॉलर्सच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती असा दावा तिच्या वकिलाने केला होता.

सुखविंदर ही 18 ऑक्टोबर 2021 रोजी फ्लोरिडाची नंबल प्लेट असलेल्या कारद्वारे अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडत होती. तिची कार तपासणीसाठी रोखण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली होती. परंतु तिने कार न रोखल्याने अधिकाऱ्यांनी पाठलाग केला होता. पुढे कार रोखत अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत कारमधून ड्रग्जने भरलेल्या बॅगा, दोन आयफो आणि एक आयपॅड हस्तगत झाला होता.

Comments are closed.