IPL 2026 मध्ये देशाचा चुकीचा नकाशा दाखवला, BCCI अजूनही गप्प; चाहत्यांचा संताप, कारवाई होणार का?
IPL 2026 चा धुरळा आता पुढील काही दिवसांत संपुष्टात येईल. नुकताच क्वालिफायर 1 चा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये पंजाबच्या धर्मशाळा येथे पार पडला. RCB ने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करत गुजरात टायटन्सला 92 धावांनी लोळवलं आणि थाटात फायनलमध्ये धडक मारली. विशेष म्हणजे या सामन्यात RCB ने आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील 254 या सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. मात्र, हा सामना आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला असून चाहते संतप्त झालेत.
आरसीबी आणि गुजरात टायटन्सचे चाहते मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर जमले होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 254 धावा चोपून काढल्या. आरसीबीची फलंदाजी झाल्यानंतर चाहत्यांच्या मनोरंजनासाठी स्टेडियमवर लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यांमुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. लेझर शो दरम्यान व्हायोलिन वादकांनी जबरदस्त सादरीकरण करत चाहत्यांची मन जिंकली. मात्र, या लेझर शो दरम्यान आयपीएलच्या ट्रॉफीवर देशाचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला जातोय. त्याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून देशवासियांनी आपला संताप व्यक्त केला आहे. देशाचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात असून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

मात्र, या सर्व प्रकारावर BCCI ने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांचा संताप अधिक वाढला असून सोशल मीडियावर BCCI आणि आयपीएल व्यवस्थापनावर सडकून टीका करण्यात येत आहे. कहर म्हणजे हा लेझर शोचा व्हिडीओ अजूनही IPL ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवलेला नाही. या सर्व प्रकारावर BCCI ने माफी मागावी आणि संबंधित व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चाहत्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
कृपया IPL क्वालिफायर 1 मध्ये भारताचा नकाशा विकृत करण्याचे कारण स्पष्ट करा? ही राष्ट्रविरोधी कृती नाही का?@IPL @BCCI @जयशाह कृपया याकडे लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा @AmitShah @narendramodi @PMOIndia @राजनाथसिंह @राहुलगांधी @priyankagandhi @INCIndia @ravish_journo pic.twitter.com/iJIPxC6r7d
— कृष्णा (@Krishna10170681) २६ मे २०२६
Comments are closed.