आरसीबी पुन्हा चॅम्पियन!! गुजरातच्या चारी मुंड्या चित दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यापूर्वी दोन्ही संघ दुसऱ्या किताबाच्या शोधात होते, मात्र अखेर बाजी आरसीबीने मारली.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 8 बाद 155 धावा केल्या. जोस बटलर (20), वॉशिंग्टन सुंदर (50*) आणि अरशद खान (15) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. आरसीबीकडून रसिक दर सलामने 3 विकेट्स घेत गुजरातला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
लक्षाचा पाठलाग करताना आरसीबीने 18व्या षटकात विजय नोंदवला. ज्यामध्ये विराट कोहलीने नाबाद (75) अर्धशतकी खेळी केली. व्यंकटेश अय्यरने झटपट 32 धावा केल्या.
बातमीची अपडेट होत आहे…
Comments are closed.