IPL 2026 – आरसीबीपुढे दुबळ्या लखनौचे आव्हान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लखनौ सुपर जायंट्सवर गेल्या सामन्यात मोठय़ा पराभवाची नामुष्की ओढवली होती. मुंबई इंडियन्सने त्यांना चीतपट केले होते. त्यामुळे लखनौचा संघ हा यंदाच्या स्पर्धेतील सर्वात दुबळा समजला जात आहे. आता गुरुवारी लखनौचा संघ दोन हात करणार आहे तो दिग्गज आरसीबीच्या संघाबरोबर. आरसीबीने सातत्य राखत दुसरे स्थान पटकावले असून अव्वल स्थानावर जाण्यासाठी त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.

विराट कोहलीवर सर्वांचे लक्ष

आरसीबीचा सलामीवीर जेकब बेथेल चांगल्या फॉर्मात असला तर विराट कोहलीला अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. त्यामुळे विराट कोहली या सामन्यामध्ये फॉर्मात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. टीम डेव्हिडसारख्या खेळाडूला अजूनही लय सापडलेली दिसत नाही. आरसीबीच्या गोलंदाजीच्या भुवनेश्वर पुमारमुळे चांगला आकार मिळाला आहे. भुवनेश्वरला जोश हेझलवूडची उत्तम साथ मिळत आहे. त्याचबरोबर रासीख सलाम हा संघासाठी ट्रम्प कार्ड ठरत आहे.

लखनौपुढे लाज वाचण्याची लढाई

गेल्या पाचही सामन्यांत लखनौला विजय काही मिळवता आलेला नाही. यावरून त्यांची कामगिरी कशी होत आहे हे लक्षात येऊ शकते. गेल्या सामन्यात निकोलस पूरनने तुफानी फटकेबाजी केली होती, पण त्याला सुयोग्य साथ कोणाचीही मिळू शकली नाही. लखनौची फलंदाजी ही सध्या डोकेदुखी ठरत आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी हा त्यांच्यासाठी हुकमी एक्का आहे. शमीला अवेश खानची चांगली साथ मिळू शकते. प्रिन्स यादवसारखा गोलंदाजही चांगली छाप पाडताना दिसत आहे.

Comments are closed.