IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, मुंबईचा पहिला सामना कधी?
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज इंडियन प्रीमिअर लीग 2026 चं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं पहिल्या 16 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे, या 16 दिवसात 20 सामने होणार आहेत. आयपीएलचं उर्वरित वेळापत्रक पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर जाहीर केलं जाईल. आयपीएलच्या 19 व्या हंगामाची सुरुवात 28 मार्चपासून होणार आहे. आरसीबीचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद विरोधात होणार आहे. हा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.
सर्वसाधारणपणे आयपीएलचा पहिला सामना गतवर्षी अंतिम फेरीचा सामना खेळणाऱ्या दोन संघांमध्ये होत असतो. यावेळी मात्र आयपीएलकडून यात बदल करण्यात आला आहे. आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याऐवजी आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे.
IPL 2026 Schedule : 20 सामन्यांचं वेळापत्रक
1. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 28 मार्च, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)
2. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, मुंबई (सायं.7.30 वाजता)
3. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 30 मार्च, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
4. पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च, न्यू चंदीगड, (सायं.7.30 वाजता)
5. लखनौ सुपर जायंटस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 1 एप्रिल, लखनौ (सायं.7.30 वाजता)
6. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद,2 एप्रिल,कोलकाता (सायं.7.30 वाजता)
7. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज,3 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)
8. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 4 एप्रिल, दिल्ली (दुपारी 3.30 वाजता)
9. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 4 एप्रिल, अहमदाबाद (सायं.7.30 वाजता)
10. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 5 एप्रिल, हैदराबाद, (दुपारी 3.30 वाजता)
11. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)
12. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 6 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)
13. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 7 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
14. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 8 एप्रिल, दिल्ली (सायं.7.30 वाजता)
15. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 9 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)
16. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 10 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
17. पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 11 एप्रिल, न्यू चंदीगड (दुपारी 3.30 वाजता)
18. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 11 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)
19. लखनौ सुपर जायंटस विरुद्ध गुजरात टायटन्स, 12 एप्रिल, लखनौ (दुपारी 3.30 वाजता)
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 12 एप्रिल, मुंबई (सायं.7.30 वाजता)
🚨 बातम्या 🚨
च्या पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक सादर करत आहे #TATAIPL 2026, 28 मार्च ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत खेळला जाईल 🗓️
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल.
अधिक तपशील ▶️… pic.twitter.com/8Iq492v8TE
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 11 मार्च 2026
आणखी वाचा
Comments are closed.