KKR ने कॅमेरॉन ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले, पण त्याला मिळणार फक्त 18 कोटी; 7.20 कोटी

आयपीएल लिलाव 2026 कॅमेरून ग्रीन किंमत: आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात कॅमेरॉन ग्रीनला मोठी रक्कम मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती आणि नेमके तसेच घडले. कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) पर्समध्ये सर्वाधिक रक्कम होती आणि त्यांनी याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमेरॉन ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र नवीन नियमामुळे कॅमेरॉन ग्रीनला फक्त 18 कोटी रुपये मिळतील. (IPL 2026 Auction Marathi News)

कॅमेरॉन ग्रीनच्या पगारातून 7.2 कोटी रुपये कापले जाणार- (Cameron Green IPL 2026 Price)

कॅमेरॉन ग्रीनला संघात सामील करुन घेण्यासाठी केकेआरने जरी 25.20 कोटी रुपये मोजले. मात्र कॅमेरॉन ग्रीनला यामधून फक्त 18 कोटी रुपये मिळतील. कॅमेरॉन ग्रीनच्या पगारातून 7.2 कोटी रुपये कापले जातील. उर्वरित रक्कम बीसीसीआयद्वारे चालवल्या जाणाऱ्या खेळाडू कल्याण कार्यक्रमांना पुनर्निर्देशित केली जाईल. याचा अर्थ कोलकाता नाईट रायडर्स ग्रीनला 18 कोटी रुपये देईल आणि उर्वरित 7.20 कोटी रुपये बीसीसीआयला जातील.

कॅमेरॉन ग्रीन आयपीएल कारकीर्द- (Cameron Green IPL 2026)

26 वर्षीय कॅमेरॉन ग्रीनने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्या हंगामात, कॅमेरॉन ग्रीनने मुंबई इंडियन्ससाठी 16 सामन्यांमध्ये 452 धावा केल्या आणि 6 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये, कॅमेरॉन ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला. गेल्या हंगामात कॅमेरॉन ग्रीन 13 सामन्यांमध्ये 255 धावा केल्या आणि 10 विकेट्स पटकावल्या. कोलकाता नाईट रायडर्स कॅमेरॉन ग्रीनचा तिसरा आयपीएल संघ बनला.

संबंधित बातमी:

IPL 2026 Auction Live: MS धोनीने घडवलं, पण यंदा संघातून बाहेर काढलं; मथिशा पाथिरानाने IPL चं ऑक्शन गाजवलं, श्रीलंकेचा सर्वात महागडा खेळाडू ठरला

IPL Auction 2026: बेअरस्टो, सर्फराज, पृथ्वीपासून रचीन डेवॉनपर्यंत…; IPL 2026 च्या लिलावात दिग्गज खेळाडू Unsold, न विकलेल्या खेळाडूंची यादी!

आणखी वाचा

Comments are closed.