RCB ते CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट

आयपीएल 2026 पॉइंट टेबल अपडेट एलएसजी वि डीसी मॅच : आयपीएल (IPL) 2026 च्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला आहे. सुरुवातीच्या या टप्प्यातच गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे, ज्यामुळे स्पर्धा अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजस्थान रॉयल्स (RR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), मुंबई इंडियन्स (MI), पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांनी आपापले पहिले सामने जिंकून प्रत्येकी 2 गुण मिळवले आहेत.

राजस्थान रॉयल्स टेबल टॉपर… (राजस्थान रॉयल्स आयपीएल 2026 पॉइंट टेबल)

राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात केवळ विजयच मिळवला नाही, तर चेन्नई संघाचा अक्षरश: धुव्वा उडवला. या मोठ्या विजयाचा फायदा त्यांना नेट रन रेट (Net Run Rate) झाला आहे. +4.171 अशा जबरदस्त नेट रन रेटसह राजस्थानने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच इतका मोठा रन रेट राखणे ही इतर संघांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मुंबई इंडियन्सची घसरण (Mumbai Indians IPL 2026 Points Table)

दुसरीकडे, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) संघानेही यंदा विजयाने खाते उघडले आहे. पहिल्या सामन्यानंतर मुंबईचे 2 गुण असून ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरली आहेत. दिल्ली कॅपिटल्स 1 सामन्यात 1 विजय मिळवून +1.397 च्या नेट रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

चेन्नई सुपर किंग्सची खराब कामगिरी; तळाला स्थान (Chennai Super Kings IPL 2026 Points Table)

गुजरात टायटन्सने (GT) कोलकाता नाइट रायडर्सला (KKR), लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या संघांना पहिल्याच सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. चाहत्यांच्या लाडक्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) साठी पण हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. चेन्नई सध्या खराब (-4.171) रन रेटमुळे सर्वात शेवटच्या म्हणजे 10 व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. पहिल्या सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत सर्वात शेवटी म्हणजेच तळाला आहे.

हे ही वाचा –

LSG vs DC IPL 2026 : लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते

आणखी वाचा

Comments are closed.