42 चौकार, 16 षटकार अन् 346 धावा… 14 वर्षाच्या इरा जाधवचा धमाका! आजपर्यंत कोणालाच जमलं नाही ते

मुंबईच्या 14 वर्षीय खेळाडूने 19 वर्षांखालील स्तरावर त्रिशतक ठोकले: मुंबईची 14 वर्षीय खेळाडू इरा जाधवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत धमाकेदार त्रिशतक झळकावले. यासह, ती 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. आजपर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला एवढी मोठी धावसंख्या करता आली नव्हती, पण इरा जाधवने इतिहास रचला आहे.

इरा जाधवने 157 चेंडूत केल्या 346 धावा

जर आपण इराबद्दल बोललो तर, ती फक्त १४ वर्षांची आहे. आगामी 19 वर्षांखालील महिला वर्ल्ड कप 18 जानेवारी 2025 रोजी मलेशियामध्ये सुरू होणार आहे. ज्यासाठी तिचा स्टँडबाय खेळाडूंमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. रविवारी बंगळुरूमध्ये मेघालयविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात इराने शानदार त्रिशतक झळकावून विक्रमी कामगिरी केली.

महिला अंडर-१९ एकदिवसीय कप सामन्यात शानदार खेळी करत इराने हा मोठा विक्रम केला. तिने फक्त 157 चेंडूत 346 धावांची जबरदस्त स्फोटक खेळी केली. यादरम्यान इराने 42 चौकार आणि 16 षटकार मारले. तर दुसरीकडे मुंबईची कर्णधार हर्ले गालाने 79 चेंडूत 116 धावांची खेळीही केली. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी एकूण 17 षटकार आणि 63 चौकार मारले आणि त्यामुळे संघाने 563 धावा केल्या.

आतापर्यंत, फक्त चार भारतीय महिला फलंदाजांनी अंडर-19 एकदिवसीय सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये 2013 मध्ये 224 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या दिग्गज फलंदाज स्मृती मानधना हिचेही नाव आहे. याशिवाय राघवी बिश्त हिने नाबाद 219 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने पण नाबाद 202 आणि सानिका चालकेने 200 धावा केल्या. पण आता इरा जाधवने हे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

WPL लिलाव न विकले गेले

इरा जाधवने डिसेंबरमध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) लिलाव 2025 च्या लिलावात नाव नोंदवले होते. पण त्यावेळी कोणीही तिला खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. तिची मूळ किंमत 10 लाख रुपये होती, पण ती अनसोल्ड राहिली. आता त्याने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना चुकीचे सिद्ध केले आहे. आता तिला 19 वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे बाकी आहे.

Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा…, रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?

अधिक पाहा..

Comments are closed.