मिडल ईस्टमध्ये युद्धाचा भडका उडाला ; इराणने कुवेतवर केले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले
आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला असून इराणने सोमवारी पहाटे कुवेतवर भीषण क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनचा मारा करत मोठा हल्ला केला आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कुवेतमध्ये प्रचंड घबराट पसरली असून देशभरात तातडीने धोक्याचे सायरन वाजवण्यात आले. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळांकडे धाव घेतली. कुवेतच्या अधिकृत न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, शत्रूची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट करण्यासाठी कुवेती लष्कराने आपली अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टम) तात्काळ कार्यान्वित केली होती.
Comments are closed.