इराणकडून व्यावसायिक विमानसेवा सुरू; हवाई क्षेत्र खुले केल्यानंतरचा मोठा निर्णय
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या दीर्घकाळच्या युद्धानंतर इराणने व्यावसायिक विमानसेवा पुन्हा सुरू करून एक मोठे पाऊल उचलले आहे. 50 दिवसांपेक्षा जास्त काळ युद्ध सुरू होते. आता दोन्ही देशात शस्त्रसंधी आहे. आता शनिवारी दोन महिन्यांनी प्रथमच तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. युद्धानंतर आता परिस्थिती सामान्य होत असल्याचे हे चिन्ह मानले जात आहे.
तेहरानहून पहिली विमाने तुर्कीमधील इस्तंबूल, ओमानमधील मस्कत आणि सौदी अरेबियामधील मदिना येथे रवाना झाली. अमेरिकेसोबत नुकत्याच झालेल्या शस्त्रसंधीनंतर इराणने हवाई हद्द खुली करण्यास सुरुवात केली असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. व्यावसायिक विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने परिस्थिती हळूहळू स्थिर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
इराणने जवळपास दोन महिन्यांनंतर तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा पुन्हा सुरू केली आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. शस्त्रसंधीनंतर हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा उघडण्यात आले होते आणि आता विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने परिस्थिती सामान्य स्थितीत परत येत असल्याचे संकेत मिळत आहेत.
इराणने हवाई उड्डाणे सुरू केली अली तरी आखीत देशातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रांवर अजूनही मोठे परिणाम होत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सध्याच्या तणावामुळे जागतिक कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होत आहे. यामुळेच शस्त्रसंधी असूनही आर्थिक दबाव कायम आहे.
दरम्यान, राजनैतिक हालचालींनाही वेग आला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची इस्लामाबादमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाशी अनेक फेऱ्यांची चर्चा केली. पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहे.
ट्रम्प प्रशासनानेही चर्चा पुढे नेण्यासाठी आपले विशेष दूत, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांना पाकिस्तानला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की, अलिकडच्या दिवसांत इराणकडून काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत, तरीही दोन्ही देशांमध्ये थेट संवादाऐवजी अप्रत्यक्ष चर्चाच सुरू आहे.
Comments are closed.