इस्लामाबादमध्ये इराण-पाकिस्तानात खलबते, अमेरिकेचा सहभाग नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराणमध्ये होणाऱ्या चर्चेची पूर्वतयारी म्हणून इराण पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी खलबते करणार आहे. यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची इस्लामाबादसाठी रवाना झाले आहेत. या चर्चेत अमेरिका सहभागी होणार नसल्याचे समोर आले आहे. अराघची यांनी आज पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक डार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी कायम ठेवण्यावर या चर्चेत विचारविनिमय करण्यात आला. इराणी वृत्तसंस्थांच्या हवाल्यानुसार पाकिस्ताननंतर अराघची ओमानची राजधानी मस्कत आणि त्यानंतर रशियाला भेट देतील.

Comments are closed.