Iran-Israel war – इराणचा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, चार कर्मचारी जखमी
जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही इराणने हल्ला केला आहे. इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 4 कर्मचारी जखमी झाले आहे. दुबई विमानतळाने याला दुजोरा दिला आहे.
अमेरिका-इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ला चढवला. इराणचे लष्करी मुख्यालय व इतर पायाभूत यंत्रणांना लक्ष्य करत एका मागोमाग एक घातक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलनेही अमेरिकेला साथ देत इराणची राजधानी तेहराणसह अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव केला. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशातील अमेरिकेच्या आठ तळांना लक्ष्य केले. सौदी अरब, कतार, कुवेत, बहरीन, अबुधाबी, दुबई, इराक आणि जॉर्डन येथे इराणने हवाई हल्ले केले. यावेळी इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही लक्ष्य केले.
इराणचा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, चार कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त #iranisraelwar #दुबई #dubaiaattack pic.twitter.com/ljd1nqHHVt
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 1 मार्च 2026
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका कॉनकोर्सचे किरकोळ नुकसान झाले असून ही परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यात आली आहे. आपत्कालीन प्रतिसाद पथके त्वरित तैनात करण्यात आली असून संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळली जात आहे, अशी माहिती इराणच्या हल्ल्यानंतर दुबई विमानतळाने दिली आहे.
दरम्यान, या घटनेत चार कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. आधीच लागू असलेल्या आकस्मिक योजनांमुळे बहुतेक टर्मिनल्समधील प्रवाशांना आधीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. यासंदर्भातील पुढील अपडेट्स उपलब्ध होताच दिले जातील, असेही दुबई विमानतळाने एक्सवर पोस्ट करत म्हटले.
दुबई सरकारच्या मीडिया ऑफिसने ट्विट केले, “दुबई विमानतळांनी पुष्टी केली की दुबई इंटरनॅशनल (DXB) येथे एका घटनेत किरकोळ नुकसान झाले, जे त्वरीत सामील झाले. आपत्कालीन प्रतिसाद पथके ताबडतोब तैनात करण्यात आली आणि समन्वयाने परिस्थितीचे व्यवस्थापन करत आहेत… pic.twitter.com/9CpAumj76x
— ANI (@ANI) 1 मार्च 2026
Comments are closed.