इराणचा पाकिस्तान सीमेवर हल्ला, दहशतवादी तळ उद्ध्वस्त; युद्धात मध्यस्थी करत असतानाच झटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष निवळण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. इराणने पाकिस्तानी सीमेवरच हल्ला करत जैश-अल-अदल या दहशतवादी गटाचा तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती तास्निम या वृत्तसंस्थेने दिली.

पाकिस्तानी सीमेपलीकडून आग्नेय इराणमधील सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताच्या रास्क प्रदेशात घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर इराणच्या सुरक्षा दलांनी बुधवारी पाकिस्तानी सीमेजवळ हल्ला करत जैश-अल-अदल या दहशतवादी गटाचा एक कार्यरत गट उद्ध्वस्त केला. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती तास्निम वृत्तसंस्थेने दिली. जैश-अल-जुल्म किंवा जैश-अल-अदल हा सुन्नी दहशतवादी संघटनेची 2012मध्ये स्थापना झाली. हा दहशतवादी गट गेल्या काही वर्षांपासून इराण-पाकिस्तान सीमेवर दहशतवादी कारवाया करत आहे. इराणी सुरक्षा दलांवर हल्ला केल्याचा अनेक वेळा या गटावर आरोप ठेवण्यात आला. अनेक वेळा या गटानेदेखील याची जबाबदारी स्वीकारल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.