ना उत्पादन थांबवता येईना, ना निर्यात करता येईना… इराणची तेल साठवणूक क्षमता संपली; 30 वर्षे जुन्या टँकरवर सर्व मदार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि इस्रायल-अमेरिकेमध्ये 28 फेब्रुवारीला युद्धाची ठिणगी पडली आणि या युद्धाच्या झळा जगभरातील देशांना बसल्या. जवळपास 40 दिवस क्षेपणास्त्र, ड्रोन आणि हवाई हल्ले केल्यानंतर युद्धविराम झाला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे शांतता चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहे. एकीकडे शांतता चर्चा सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेने होर्मुझची नाकेबंदी कायम ठेवली आहे. यामुळे इराण सध्या एका मोठ्या कोंडीत सापडला आहे.

दररोज उत्पादन होणारे कच्चे तेल निर्यातही करता येईना आणि विहिरींचे नुकसान टाळण्यासाठी उत्पादनही थांबवता येईना, अशा दुहेरी पेचामध्ये इराण अडकला आहे. तेल निर्यात होत नसल्याने इराणची तेल साठवणूक क्षमताही संपत चालली आहे. यावर उपाय म्हणून इराणने 30 वर्षे जुन्या ‘नाशा’ या जहाजाला पुन्हा कार्यान्वित केले आहे. या जहाजाचा वापर समुद्रात तेल साठवण्यासाठी केला जाणार आहे.

Comments are closed.