Iran US War – नीट वागा, नाहीतर धडा शिकवू; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा कारवाईचा इशारा
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध तात्पुरते थांबले असले तरी अद्यापही दोन्ही देशातील तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहेत. इराणने युद्ध कायमस्वरुपी थांबवण्यासाठी एक नवीन प्रस्ताव सादर केला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या प्रस्तावाचा आढावा घेत आहेत. अर्थात हा प्रस्ताव स्वीकारला जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. अशातच डोनाल्ट ड्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये पत्रकारांशी बोलताना इराणला पुन्हा एकदा हल्ल्यांची धमकी दिली आहे.
व्हिडिओ | इराणवर पुन्हा लष्करी हल्ले सुरू केल्याबद्दल, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, “जर त्यांनी गैरवर्तन केले, जर त्यांनी काही वाईट केले तर, परंतु आत्ता, आम्ही पाहू.”
(स्रोत: AFP/PTI) फक्त भारतात वापरण्यासाठी pic.twitter.com/KWB4F8uc86
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) ३ मे २०२६
Comments are closed.