मुंबईत धक्कादायक घटना, मुलुंडमध्ये फेरीवाल्याचा चाकू हल्ल्यात मृत्यू, पत्नीशी अनैतिक संबंधाचा र
मुंबई क्राईम न्यूज: मुंबईतील (Mumbai) मुलुंड (Mulund) परिसरात एका 24 वर्षीय फेरीवाल्यावर चाकूने वार करत त्याला संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून हे प्रकरण घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणी 42 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Mumbai Crime news: भररस्त्यात चाकूने केला हल्ला
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बिंद (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुलुंड परिसरात फेरीवाल्याचे काम करत होता. शनिवारी भररस्त्यात संतोषवर राकेश धिवार (वय 42) याने चाकूने वार केले. या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Mumbai Crime news: अनैतिक संबंधाचा संशय
आरोपी राकेश धिवार याला संशय होता की, मृत संतोष बिंद याचे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाले होते. घटनेच्या दिवशी संतोषने राकेशला काहीतरी बोलून चिथावणी दिली, ज्यामुळे राकेशचा संयम सुटला. रागाच्या भरात त्याने सोबत आणलेल्या चाकूने संतोषवर हल्ला करून त्याला संपवले.
Mumbai Crime news: पोलीस कारवाई आणि तपास
या थरारक घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपी राकेश धिवार याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे मुलुंडमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.