‘नराधमाला भरचौकात..पुण्यातील नसरापूरात चिमुकलीवर अत्याचार, शरद पोंक्षे संतापले; केली मोठी मागणी

नसरापूर पुणे बालगुन्हेगारी शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया माणुसकीला काळिमा फासणारी घटना  पुण्यातील भोर  तालुक्यातील नसरापूर (Pune Nasrapur) येथे घडली. एका 65  वर्षीय नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला. एवढेच  नाही तर, तिची दगडाने ठेचून हत्या केली. ही  घटना उघडकीस येताच राज्यभरातून संतापाची लाट उसळली. नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत. सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,  नराधम हा पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी आता सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जातोय. अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त केला आहे. ‘ नराधमाला भर चौकात लोकांच्या हातात सोपवा. लोकं न्याय मिळवून देतील’, अशा कडक शब्दांत त्यांनी पोस्टच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला.

नसरापूर येथील धक्कादायक घटना चीड आणि  संताप आणणारी आहे. 65  वर्षीय नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. नंतर  तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.    या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. सध्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,  नागरिकांच्या या मागणीने जोर धरला आहे. अभिनेते शरद पोक्षे यांनीही पोस्टच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन समर्थन दर्शवलं.  नसरापूर प्रकरणावर शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले पाहूयात.

शरद पोंक्षे यांची व्हायरल पोस्ट (Sharad Ponkshe reaction on Nasrapur case)

‘नराधमाला भर चौकात लोकांच्या हातात सोपवा .लोकं न्याय मिळवून देतील,पण असं होणार नाही. गुन्हेगाराला शिक्षेची भितीच नाही. हा गुन्हेगार या आधीही असाच सुटला होता. परत तेच तेच तेच रोज घडतंय.  बलात्कार, लव जिहादच्या जाळ्यात आमच्या माता भगिनी भरडल्या जातायेत.अत्यंत असहाय्य आहोत आम्ही .सुचत नाहीये…’ असं शरद पोक्षें यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.  अनेकांनी त्यांच्या फेसबूक पोस्टवर प्रतिक्रिया देत नराधमाच्या कृत्याचा संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ही संतप्त घटना घडली.  आरोपीने आधी चिमुकलीला गोठ्यात नेले. नंतर तिच्यावर अत्याचार केला.   नराधम एवढ्यावरच थांबला नाही.  आरोपीने  चिमुकलीला दगडाने ठेचून मारलं.   नंतर नराधमाने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरलं. या संतप्त  घटनेनंतर परिसरात  संतापाची लाट उसळली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मालिकेतून थेट मोठ्या पडद्यावर! ‘मुरांबा’ फेम अभिनेत्री ‘राजा शिवाजी’ सिनेमात झळकली, ‘हिला’ ओळखलंत का?

आणखी वाचा

Comments are closed.