देशाची आर्थिक कोंडी! विश्वगुरु’ असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधानांचे मौन, कोल्हेंची टीका

अमोल कोल्हे वर पंतप्रधान नरेंद्र मोदी : इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. भारताला देखील मोठा फटका बसत आहे. घरघुती गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा भासत असल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका हॉटेल व्यवसायिकांना बसत आहे. दरम्यान, या वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारव रटीका केली आहे. रशिया, युक्रेन आणि इराण-इस्रायलमधील युद्धाचे पडसाद उमटतायत खरंय, पण त्या आडून जनतेला महागाईच्या खाईत लोटणं हे कोणत्या धोरणात बसतं? असा सवाल कोल्हे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?  ‘

माझ्या मतदारसंघातील चाकण MIDC असो वा हडपसर-भोसरीचा पट्टा; आज उद्योगांना ऊर्जेचा आणि इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. अनेक कंपन्या 50 टक्के क्षमतेने चालतायत, तर काहींनी उत्पादने थांबवली आहेत. कामगारांच्या हाताला काम नाही आणि उद्योजकांच्या डोक्यावर चिंतेचं सावट आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गॅस पुरवठा खंडित होतोय, हॉटेलं बंद पडतायत, कष्टकऱ्यांचा रोजगार जातोय, आंतरराष्ट्रीय धोरणाच्या नावाखाली इंधन दरवाढ थोपवण्यात सरकार अपयशी ठरलंय. परिणामी, आमच्या शेतकऱ्यांची हक्काची साखर बंदरांवर धूळ खात पडून आहे आणि शेतमाल सडतोय. पण दुर्दैव असं, की देशाची ही आर्थिक कोंडी होत असताना ‘विश्वगुरु’ असल्याचा डांगोरा पिटणारे सरकार आणि मा. पंतप्रधान मात्र मौन बाळगून आहेत.

सरकारने तात्काळ पार्लमेंटरी जॉइंट कमिटीची बैठक बोलावून चर्चा करावी

या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मागणीनुसार, सरकारने तात्काळ पार्लमेंटरी जॉइंट कमिटीची बैठक बोलावून यावर सविस्तर चर्चा घडवून आणावी ही आमची आग्रही मागणी आहे. परराष्ट्र धोरण जर देशांतर्गत सुरक्षा आणि स्वस्त जीवन देऊ शकत नसेल, तर ते धोरण सपशेल फसलेलं आहे. माझ्या तमाम जनतेला विनंती आहे की परिस्थिती बिकट आहे, गॅस आणि इंधनाचा वापर अत्यंत जपून करा. संकटाच्या काळात एकमेकांना आधार द्या. सरकार झोपलंय, मात्र आपण जागृत राहूया असे कोल्हे म्हणाले.

इराण-इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. आतापर्यंत, फक्त कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या किमती वाढण्याबद्दल चर्चा सुरु होती. परंतू, अर्थतज्ज्ञांचे मते हे  केवळ अर्धे चित्र आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक थांबण्यापेक्षाही धोकादायक म्हणजे खत पुरवठा साखळीतील व्यत्यय. हे एक असे संकट आहे जे येत्या काही महिन्यांत जागतिक अन्न उत्पादन मंदावेल आणि महागाई नवीन पातळीवर जाण्याची शक्यता आहे. शेतीच्या गरजांसाठी आयातीवर मोठ्या प्रमाणात भारत अवलंबून आहे.

महत्वाच्या बातम्या:

इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत

आणखी वाचा

Comments are closed.